Home >> About us >> Press Releases >> IoT Launch Mar
Relief for societies with sewage treatment plants in PMC and PCMC
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कित्येक सोसायटींमध्ये बिल्डर द्वारे "सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा" (sewage treatment plant - एस. टी. पी.) बसवून देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रक मंडळाने एस. टी. पी. चालवणे व शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा फ्लशिंग आणि झाडांकरिता वापर करणे हे मोठ्या सोसाट्यांसाठी बंधनकारक केले आहे. शुद्धीकरण केल्याशिवाय सांडपाणी बाहेर सोडल्यास सोसायटीला दंड सुद्धा भरावा लागतो. परंतु या प्लांट चा ऑपरेटिंग खर्च खूप असल्यामुळे बऱ्याच सोसायटी हा प्लांट चालवणे टाळतात. या खर्चांमधे ऑपरेटरचा पगार (सर्वात मोठा खर्च), विजेचे बिल, केमिकल व यंत्रणेचे मेन्टेनन्स इ. चा समावेश असतो.
पाम एन्विरॉन्मेंटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पुणे स्थित कंपनीने लावलेल्या शोधामुळे आता एस. टी. पी. चालवणाऱ्या ऑपरेटर चा खर्च अर्ध्याहुनही कमी होऊ शकतो. म्हणजे वर्षाला ४-५ लाख रुपयांची बचत होऊ शकते.
IoT व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानांची सांगड घालून, अनुभव व कौशल्याचा वापर करून या कंपनीने एस. टी. पी. चालविण्यासाठी नवीन प्रक्रिया व सॉफ्टवेअर बनविले आहे. त्यामुळे सर्व एस. टी. पी. या कंपनीच्या डेटा सेंटर मधून चालविणे शक्य होईल व फक्त आवश्यक अशा कामांसाठी मनुष्यबळ प्लांट वर पाठविण्यात येईल. यामुळे मनुष्यबळ आणि त्याचा खर्च विभाजित होईल. तसेच वीज व केमिकल चा अपव्यय टाळण्यासही या प्रणालीमुळे मदत होईल.
जास्तीत जास्त एस. टी. पी. चालविणे, पाण्याचा पुरेपूर पुनर्वापर करणे यामुळे नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर ताण कमी होईल, सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणांवर ताण येणार नाही व आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी उपलब्द्ध राहील या उद्देशाने हे सोलुशन बनवण्यात आले आहे.
या उद्देशाला साध्य करण्यासाठी असे अजून अनेक संशोधन व उपक्रम राबवित असल्याचे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अविनाश हरले यांनी सांगितले.
सोसायटी आणि कंपनी मध्ये थेट करार करून किंवा आता करार असलेल्या ऑपरेटरसोबत पार्टनरशिप करून या सोलुशनचा फायदा घेता येऊ शकतो.
सुरुवातीला पश्चिम पुणे व पिंपरी चिंचवड या परिसरातील सोसायटी साठी हे सोलुशन उपलब्ध केले गेले आहे. उर्वरित पुणे शहर व देशातील ईतर शहरांसाठी टप्प्या-टप्प्याने हे सोलुशन उपलब्ध करण्यात येईल.
संपर्क: +91 8007767799, admin@pammindia.com, www.pammindia.com